घनसावंगी तालुका
कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी-गटनेते अनिरूद्ध शिंदे
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. तसेच राज्य शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करुन आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समितीचे सदस्य तथा शिवसेना गटनेते अनिरुद्ध शिंदे यांनी केले आहे.
कोरोणा महामारीने अख्खा जगभरात थैमान घातले असून महाराष्ट्रात हि कोरोनाची रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आपण स्व:त पुढाकार घेवून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,व तसेच जेष्ठ नागरिक तरूणांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन पंचायत समिती गटनेते अनिरुद्ध शिंदे यांनी केले आहे.