संपादकीय

प्लाझ्मा कोण दान करू शकतो ? प्लाझ्मा आणि कोरोना रुग्णावर उपचार… थोडं जाणून घेऊया…

प्लाझ्मा’ हा शब्द पूर्वी फारसा आपण ऐकलेला नाही हे खरं असलं तरी कोरोना आजार आल्यापासून ‘प्लाझ्मा’ दान करा… कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी एक प्रभावी उपचार… असं डॉक्टरांकडून आपण ऐकलं असेलचं, त्यामुळेच आता सरकार देखील प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र नागरिकांना जाहीर आवाहन करत असल्याचं आपण पाहत आहोत.

images (60)
images (60)

प्लाझ्मा म्हणजे काय? असा नेहमीचा साधा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे आपण थोडं प्लाझ्मा बद्दल जाणून घेऊया,प्ला्झ्मा हा रक्तातातील एक पिवळसर द्रव घटक असून त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते. त्यात जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात त्यास प्लाझ्मा असं म्हणतात.

आता आपण जाणून घेऊया की, नेमकं प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? तर त्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कोरोना आजारातून संपूर्णतः बऱ्या झालेल्या व्यक्तीचा सुमारे 28 दिवसांनंतर प्लाझ्मा काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.

अलीकडच्या काळात कोरोनाच्या गंभीर रुग्णांनावर ‘प्लाझ्मा थेरपी’ प्रभावी उपचार ठरत असल्याने प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तीने प्लाझ्मा दान करायला हवा.

प्लाझ्मा दान कोण करू शकतात? याबाबत स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे, ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे, जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतात, एक व्यक्ती साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा दान करू शकतात.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!