अंबड तालुका
माजी आमदार संतोष सांबरे यांची शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बँक व्यस्थापक यांच्याशी चर्चा
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी चर्चा
बदनापूर प्रतिनिधी/
किशोर सिरसाट
ता. 30
मौ जामखेड ता अंबड येथील अनेक शेतकऱ्यांनी युनियन बँक, जामखेड शाखे मध्ये OTS ची रक्कम जमा केल्यानंतर बँक स्टेटमेंट मध्ये दाखविण्यात आलेली रक्कम व प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम या मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनात आले आहे,,या बाबतीत सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने जामखेड युनियन बँकेत धडक देऊन मॅनेजर ला सविस्तर जाब विचारला व मा जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांच्या शी चर्चा करून या गंभीर विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात DDR सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे माजी आमदार संतोष सांबरे यांनी या वेळी सर्व शेतकऱ्यांसमोर सांगितले.