जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

जालना जिल्ह्यातील बंद बाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करा-राज्यमंत्री शंभुराज देसाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी -- राज्यमंत्री शंभुराज देसाई

जालना, दि. 1 (न्यूज जालना) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी संपुर्ण राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात या निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व पणन राज्यमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

images (60)
images (60)

यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हा घडल्यानंतर व तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो दाखल करुन घेतलाच नाही अशी परिस्थिती आढाव्या दरम्यान आढळुन आली नाही. घडलेल्या गुन्ह्यांचा शोध व प्राप्त तक्रारींचा निपटारा ही प्रक्रिया जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे.कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना सकाळी 11 नंतर सुरु ठेवण्यास मनाई केली आहे.
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण गर्दी करणारे, विनाकारण रत्यावर फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे अशा व्यक्तींवर जिल्हा पोलीस दलामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत. याकामी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी मदत मिळाली.

· गतवर्षातील लॉकडाऊनमध्ये व सध्याच्या कडक निर्बंधामध्ये कोव्हीडसंदर्भातील जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्देवी निधन झाले. निकषात बसणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनामार्फत मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल.

· कोव्हीडच्या काळात जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना फिल्डवर काम करावे लागते. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या असुन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायजरसह ईतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. यामध्ये काही कमतरता भासल्यास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार.

· गत पंधरा दिवसांमध्ये राज्यात कडक निर्बंध लावल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस हे निर्बंध अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना पोलीस विभागास देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!