घनसावंगी तालुका
अखेर विरेगव्हाण तांडा येथील वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक बसविले
न्यूज जालना बातमीचा दणका
येथील वळण रस्त्यावर बसविण्यात आलेला फलक
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
अंबड ते पाथरी राज्य महामार्गाचे काम सुरू असून.या महामार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची रात्रंदिवस नेहमीच वर्दळ असते.पादचारी व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.याबाबत ‘विरेगव्हाण तांडा येथील वळण रस्ता बनला धोकादायक’ या मथळ्याखाली दि.७ रोजी न्यूज जालना मध्ये वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभाग खडबडीत जागे होऊन अखेर येथील वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक बसविण्यात आले.या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले