खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घाला -प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून दिले निवेदन
जालना, दि. ६(प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून तेथे त्यांची अडवणूक होत असून खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घालावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष जालना जिल्हाध्यक्ष विदुर लाघडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन चर्चा करून सविस्तर निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनामध्ये विदुर लाघडे यांनी असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरणा सह इतर आजारी लोकांना बेड शिल्लक नाही म्हणून प्रवेश नाकारल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक खाजगी रुग्णालयांमध्ये मान्य बेड व रिक्त बेड याची माहिती दर्शनी भागावर लावावी. तसेच खाजगी रुग्णालयातील सेवेचे दरपत्रक दर्शनी भागावर लावावे.शिवाय कोरोना रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत अशा खाजगी रुग्णालयाचे सर्व बिल जिल्हा समितीसमोर तपासून घ्यावेत, जास्तीचे देयके आकरण्या रुग्णालयावर कारवाई करावी. तसेच या रुग्णालयाचे ऑडिट केले जावे, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाध्यक्ष लाघडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.