जालना जिल्हा

जालना:कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेणे गुन्हा

अनेक मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या

जालना दि.6 (न्यूज जालना ) कोरोनाने आई-वडिल दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेविना परस्पर बालकांना दत्तक देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशाप्रकारे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015, तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाईस पात्र असुन अशा घटनांची माहिती मिळाल्यास त्वरित 1098, 8308992222, 7400015518 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जालना यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले
अनेक मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या

images (60)
images (60)

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच , आता कोरोनामुळे दोन्ही पालकांच्या मृत्यु झाल्याने अनेक मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. या अनाथ बालकांचा स्वीकार नातेवाईकाकडुन न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

एकीकडे या बालकांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असुन काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणुन करुन घेत परस्पर मुलांची विक्री करत आहेत. समाज माध्यमांवरील पोस्टवरुन असे दिसुन आले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाज माध्यमांचा वापर करुन त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात असुन बालके दत्तकास उपलब्ध आहेत. असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यातुन समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी सर्वांनी जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.

बालकांची परस्पर दत्तक देवाण घेवाण- परंतु अशा प्रकारे बालकांची परस्पर दतक देवाण घेवाण करणे हा कायदयानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 ,बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम ,2015 तसेच दत्तक नियमावली ,2017 नुसार कठोर कारवाईस पात्र असेल अशी माहिती ही विभागाच्या वतीने आली आहे. अशा घटना उघडकीस आल्यास , प्रत्येक जिल्हयातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,जिल्हा बाल संरक्षण कक्ष , बाल कल्याण समिती आणि पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधुन या बालकांना ताब्यात दयावे, त्यांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.

बाळ दत्तक घेण्यासाठी त्याचबरोबर ज्या पालकांना बालक दत्तक घ्यायचे आहे. अशा पालकांसाठी कायदेशिर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या कारा (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी )या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्याआधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करु शकतात असेही महिला आणि बालविकास विभागाने कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!