कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना:आजी बरंय का! विभागीय आयुक्तांनी केली आजीबाईच्या तब्येतीची चौकशी

जालन्यात ७० वर्षीय आजीबाईंनी दिली कोरोनाला मात; विभागीय आयुक्तांनी घेतली भेट

न्यूज जालना –
आजीबाईंच वय 70,सिटीस्कॅन चा स्कोर 25 पैकी 25. असे असतानाही आजीबाईंनी आज कोरणा वर मात करत सामान्य रुग्णालयातून घरी जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला. कौतुकाची बाब म्हणजे नातेवाईकांनीही धीर सोडला होता अशा परिस्थितीमध्ये यवतमाळच्या या आजीबाईंना गेल्या चौदा दिवसांपासून जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या आज ठणठणीत बऱ्या झाल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, सहाय्यक जिल्हा शकेल शल्यचिकित्सक डॉक्टर पद्मजा सराफ, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज या आजीबाईंना रुग्णालयातून निरोप दिला.

images (60)
images (60)

गेल्या वर्षभरापासून कोविड आजारामुळे सर्व जगच परेशान आहे. या आजाराची काही वर्गवारी नाही. तरुण अबालवृद्ध सर्वच या आजाराने ग्रासले आहेत. अशा परिस्थितीत एका 70 वर्षीय आजीबाईंनी 25 चा स्कोर असताना देखील कोरोनावर मात केली. तिच्या इच्छाशक्तीला विभागीय आयुक्तांनी दाद दिली आहे.

यवतमाळ येथील देऊबाई जायभाये या 70 वर्षीय आजीबाईंना कोविड आजार झाला आणि त्यांना ऑक्सिजनचे बेड पाहण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. पाच दिवस यवतमाळला प्रत्येक दवाखान्यात हजेरी लावल्यानंतर देखील बेड मिळाला नाही. त्यामुळे, नातेवाईकांनी देखील आशा सोडली होती, परंतु एक शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आजीबाईंना अशा परिस्थितीत 24 एप्रिलला जालन्यात आणले. येथील एका खासगी इमेजिंग सेंटरमध्ये त्यांचे सिटीस्कॅन केले. त्यामध्ये त्यांचा स्कोअर 25 पैकी 25 आला. नातेवाईक घाबरून गेले आणि पुन्हा ऑक्सिजन बेडचा शोध सुरू झाला. कसेबसे करून सामान्य रुग्णालयातील एक बेड मिळाला. त्यांना भरती करण्यात आले. कोरोना रुग्णालयात भरती करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांप्रमाणे आजीबाईंवरही उपचार करण्यात आले आणि या उपचारांना आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला.
त्याचसोबत त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती, त्यामुळे औषधींचा त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम झाला आणि आज 14 दिवसानंतर त्या बऱ्या झाल्या.
अधिकाऱ्यांनाही कौतुक वय आणि स्कोअर दोन्ही जास्त असताना देखील आजीबाई ठणठणीत बऱ्या होऊन घरी जात आहेत, याचे कौतुक आणि आनंद सर्वांनाच होत आहे. त्यातच भर पडली ती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीची. या आजीबीईंची आज सुट्टी होणार असल्याची माहिती केंद्रेकर यांना कळताच त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे या आजीबईंची भेट घेतली आणि केलेल्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली. येथील डॉक्टरांच्या उपचारामुळेच मी बरी झाली, अशी प्रतिक्रिया देखील आजीबाईंनी सर्वांसमक्ष दिली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक पद्मजा सराफ, डॉक्टर बी.बी. सानप आणि आरोग्य विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित या आजीबाईंना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!