कोरोना अपडेटमहाराष्ट्र न्यूज

कोवीड 19 नंतर म्युकॉरमायकोसिसचा धोका, धुळ्यात 55 रुग्ण अढळले.

images (60)
images (60)

*चिंताजनक! धुळ्यात 55 जणांना कोरोनानंतर म्युकॉरमायकोसिसची लागण*

धुळे शहरातील विविध रूग्णालयातून कोविड म्युकॉरमायकोसिस कोविड नंतर आढळणारा बुरशीजन्य हा आजार असलेले रूग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.

मागील काही दिवसांपासून एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये कान, नाक, घास आणि दंतरोग विभागात या आजाराचे एकूण 55 रुग्ण आढळून आले आहेत.त्यातील 49 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून 6 रुग्णांवर शस्रक्रिया करणे अदयाप बाकी आहे.या आजराचे लवकरात लवकर निदान केल्यास रुग्ण बरा होतो अन्यथा जंतुसंसर्गामुळे डोळा गमावू लागू शकतो.

या आजारावर उपचार करण्यासाठी कान, नाक घास, आणि दंतरोग तज्ज्ञ परिश्रम घेत आहेत.

 या आजाराचे लक्षणे 
▪️ नाकामध्ये श्वास कोंडणे
▪️ नाकावर आणि टाळूवर काळ्या बुरशीचा चट्टा
▪️ दात, गाल दुखणे आणि सुजणे
▪️ चेहऱ्याच्या हाडांना असह्य वेदना
▪️ दृष्टी कमजोर होणे

याचा सर्वाधिक धोका कोणाला?

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना या आजाराचा जास्त धोका आहे.

कोविड 19 व म्युकॅारमायकोसिसचा संबंध काय?
म्युकॅारमायकोसिस हा आजार मधुमेह असणारे रुग्ण,स्टेरॉईडसवर असणारे रूग्ण, ज्या रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असते, अशा रुग्णांना धोकादायक ठरू शकतो.कोविड 19 उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्टेरॉईडस आणि आणखी काही औषधे देण्यात येतात जेणेकरून त्यांचा आजार बरा होईल, पण यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे म्युकॅारमायकोसिसचा धोका वाढतो

 निदान कसे करावे :*
सिटीस्कॅन, इंडॉस्कॉपी व बायोप्सीच्या साहाय्याने आपण लवकर  म्युकॅारमायकोसिसचे निदान करू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरित आपण दंत व मुख्य आरोग्य विशेष तज्ञ सल्ला घेणे आवश्यक आहे.

याच्यावर उपचार काय?
कोविड झालेल्या रूग्णांनी सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप तसेच नॉर्मल सलाईन, नसल स्प्रे दिवसातून 3 वेळा नाकात टाकल्यास आपण हा बुरशीचा आजार रोखू शकतो. तातडीने निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या आजारावरील उपचारासाठी धुळ्यातील एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कान, नाक, घसा विभागाचे डॉ. आर.व्ही.पाटील, डॉ.बी.एम.रूडगी, प्रा.शरण बसप्पा प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!