अंबड तालुका

अंबड शहरात सापडली दुर्मिळ प्रजातीची पाल

प्राध्यापक डॉ सूर्यवंशी सर यांनी दिली विशेष माहिती

 

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी

अंबड शहरातील मयूरनगर भागात दुर्मिळ प्रजातीची पाल संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ विजय सूर्यवंशी यांना मिळाली असून सदरील पाल ही दुर्मिळ प्रजातीची आहे.
हे त्याच्या लक्षात आले त्यानंतर त्यानी आपले सहकारी डॉ दिनेश खराटे व प्रा संदीप जिगे यांच्या मदतीने या पाली विषयी माहिती काढली असता ही पाल हेमिडॅक्टिलस ट्रायर्डस ब्लॉच्ड गेको (छोटी पाल) या वैज्ञानिक नावाने ओळखली जाते.
ती अत्यंत गोलाकार ट्यूब सारखा आकाराची शरीराने असून तिच्यावर असणाऱ्या रंगाच्या पॅटर्नद्वारे ती सहजपणे ओळखले जाऊ शकते, तिचा रंग केवळ तिचे विशिष्टच नाही तर सुंदरता देखील वाढवतो या रंगात खाली तीन पांढरे किनार असलेल्या ऑलिव्ह-ग्रीन क्रॉसबार आणि खाली गुलाबी पांढर्‍यासह बफ आहे. तरुण वयात पांढरा-काळी गडद तपकिरी क्रॉसबारसह हलका तपकिरी रंग तिचाअसतो. शेपटी नियमित काळी आणि हलकी रिंग्ज सह चिन्हांकित केलेली असते. ही पाल सामान्यत: पृष्ठभागावरील प्रजाती आहे जी बहुधा वारूळाच्या टेकड्यांच्या जवळ आढळते,यामुळेच हिला ‘टर्माइट हिल गेको’ या सामान्य नावाने ओळखले जाते . ही प्रजाती महाराष्ट्रात कमी आढळत असल्याचे दुर्मीळ समजली जाते ती जास्तीत जास्त शिवागर्लस आणि नीलगिरी, पश्चिम घाट, अजमेर, (राजस्थान), इंदूर (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक), मदुराई (तमिळनाडू) आणि त्रिवेंद्रम (केरळ) या भागात पाहण्यात मिळते . हीचे कीटक हे खाद्य असून अशी दुर्मिळ प्रजाती जालना जिल्ह्यात कुठे सापडली म्हणून याची नोंद कुठे मिळत नाही. यामुळे सध्या तरी या प्रजातीची पाल अंबड येथे वाळवीच्या वारुळाजवळ आढळली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!