घनसावंगी तालुका
अंबड पाथरी राज्य महामार्गावर विरेगव्हाण तांड्याजवळ दहा दिवसांपासून खडी पडून
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; कामाची गती वाढविण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
अंबड ते पाथरी राज्य महामार्गाचे काम वर्ष दिड वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.या रस्त्यावर दहा दिवसांपासून खडी पडून आहे.मात्र खडी टाकल्यानंतर पुढे काहीच केले नाही.यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
पाचोड अंबड घनसावंगी कुंभार पिंपळगाव आष्टी मार्गे पाथरी रस्त्याचे काम दिड वर्ष उलटले तरी हा रस्ता अपूर्णच आहे.या रस्त्यावर वाहनांची नेहमीच रहदारी असते.एकेरी रस्त्यावर खडी पडल्याने छोट मोठे अपघात घडत आहे.या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांने याकडे लक्ष देऊन हे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.