जालना जिल्हा

जिल्ह्यासाठी १० हजार घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा– पालकमंत्री राजेश टोपे

जिल्ह्यातील घरकुलांची कामे जलदगतीने पुर्ण करा

जालना, दि. 10 (news jalna):-:- जिल्ह्यातील प्रत्येक गरजु व पात्र लाभार्थ्याला घरकुल मिळावे यादृष्टीकोनातुन जिल्ह्यासाठी मंजुर असलेल्या घरकुलांची कामे अधिक जलदगतीने पुर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

images (60)
images (60)

रमाई योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती क्षीरसागर, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री घवले आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत प्रत्येकाला घर मिळावे यासाठी जालना जिल्ह्यास मंजुर करण्यात आलेल्या घरकुलांची कामे जलदगतीने पुर्ण करण्यात यावी. पुढील वर्षासाठी जालना जिल्ह्यास अधिक प्रमाणात घरकुल मंजुर घेण्यासाठी आपण व्यक्तीश: प्रयत्न करु असे सांगत १० हजार घरकुलांचा प्रस्ताव तातडीने तयार करुन शासनास पाठविण्यात यावा. त्याबाबत पाठपुरावा करुन मंजुर करुन घेण्यात येईल. ग्रामीण भागाच्या विकासासाठी गटविकास अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची गटविकास अधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

सन 2019-20 या वर्षातील मंजुर 4 हजार 273 घरकुलांच्या उद्दिष्टापैकी कागपत्राअभावी उर्वरित राहिलेल्या 353 लाभार्थ्यांचे प्रस्ताव त्रुटींची पुर्तता करण्यात येऊन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ती मंजुर करण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!