जालना जिल्हा

सामान्य रुग्णांना मोफत ऑक्जिन पुरवठा करण्याचा पोलाद उद्योग समुहाचा उपक्रम कौतुकास्पद ः आ. कैलास गोरंट्याल

जालना (प्रतिनिधी) ः करोनाच्या आजारामुळे औषधोपचाराचा खर्च भागवतांना दमछाक होत असलेल्या सर्व सामान्य कुटूंबियांना ऑक्सिजन व इतर महागडे खर्च परवडणारे नाही. नेमकी हीच नाडी ओळखुन शहरातील पोलाद उद्योग समुहाने अवघ्या 18 दिवसांत ऑक्सिजनचा भव्य प्रकल्प उभारुन या माध्यमातुन सर्व सामान्यांना मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी दिले आहे.
भारतासह संपुर्ण जगभरात करोना महामारीने गेल्या वर्ष सव्वा वर्षापासुन मोठे थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था पुर्णपणे कोलमडुन पडली असुन त्याचा मोठा फटका उद्योग जगताला बसत आहे. करोनाच्या या महामारीत अनेक कुटूंब आर्थिक दृष्टया उद्धवस्त झाली आहेत. करोना या संसर्गजन्य आजारामुळे सरकारी व खागजी रुग्णालये हाऊसफुल झाली असून अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावि मृत्यू होत आहेत. जालन्यात देखील ऑक्जिनचा मोठ्या प्रमाणात होत असलेला तुटवडा लक्षात घेवून जालना येथील पोलाद उद्योग समुहाचे संचालक विशाल अग्रवाल, नितीन काबरा, सतीष अग्रवाल यांच्या पुढाकारातुन आणि कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलाद उद्योग समुहाने अवघ्या 18 दिवसात ऑक्सिजनचा भव्य प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाला जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी आज सोमवारी सांयकाळी सदिच्छा भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली. उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे कौतुक करुन आ. गोरंट्याल म्हणाले की, या ऑक्जिन प्रकल्पामुळे निश्‍चितच सर्व सामान्य कुटूंबियांना मोठा आधार मिळणार आहे. करोनाच्या संकट काळात पोलाद उद्योग समुहाकडुन गरजु रुग्णांना ऑक्जिनचा मोफत पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहेच. शिवाय जिल्हा प्रशासनाला देखील या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार असून जिल्हा सरकारी रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये निर्माण झालेला ऑक्जिनचा तुटवडा देखील दुर होणार आहे.
पोलाद उद्योग समुहाचा हा उपक्रम अंत्यत कौतुकास्पद असल्याचे सांगुन आ. गोरंट्याल यांनी इतर उद्योग समुहाने देखील करोनाच्या संकट काळात मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी पोलाद उद्योग समुहाचे संचालक विशाल अग्रवाल, नितीन काबरा, सतीष अग्रवाल, कालीका स्टीलचे संचालक अनिल गोयल , नरेंद्र अग्रवाल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!