कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे महसुल विभागातील सर्व सुनावण्या बंद
बबनराव वाघ, उपसंपादक
जालना दि.14 :- जिल्हयात कोव्हीड -19 कोरोना विषाणु संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कोव्हीड -19 कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक एक भाग म्हणुन महसुल विभागाकडुन विविध प्रकरणी घेण्यात येणाऱ्या सुनावणी करिता जिल्हयातील नागरिक मोठया प्रमाणात कार्यालयात ये जा करीत असतात. त्यामुळे सुनावणी करिता ये जा करणारे नागरिक व अधिकारी,कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हयात कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणुन जिल्हयातील सर्व महसुल कार्यालयात होणारी सुनावणी बंद ठेवण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणुन साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधिन राहुन मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हयात महसुल विभागाकडुन घेण्यात येणाऱ्या सर्व सुनावणी (अतितातडीच्या सुनावण्या, स्थगन अर्ज इ.वगळुन) दि.1 जुन 2021 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देत आहे