आता कोविड लस घेण्यासाठी बघा काय आहे नवीन नियम
जालना दि.14 :- दि. 15 मे 2021 पासुन कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. कोव्हॅक्सीन लसीच्या यापुर्वीच्या सुचनामध्ये कोणताही बदल झालेले नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पुर्वीप्रमाणेच 4 आठवड्यानंतर देण्यात यावा.
उपलब्ध लसीचासाठा प्राधान्याने दुस-या डोससाठी वापरावा अशा मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहे. वरील बदलाप्रमाणे कोविशिल्ड लसीचा उपलब्ध साठ्याचा उपयोग हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लेवल वर्कर यांचा दुसरा डोस यांना देय आहे. त्यांना प्राधान्याने देण्यात यावा व उर्वरीत लसीचासाठा 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांच्या पहिला डोससाठी वापरण्यात यावा.
18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लसीकरणे केंद्रावर गर्दी करु नये.
लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी त्रिसुत्रीचा वापर करावा. मास्कचा नियमित वापर करावा, सॅनीटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.