घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावसह परीसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

एकीकडे कोरोनाने सर्वजण चिंतेत असले तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रानाच्या मशागतीत व्यस्त आहे.कोरोनामुळे सर्वजण भयभयीत झाले असून,कडक निर्बंधांमुळे अनेकजण घरातच बसून आहे.शेतकरी मात्र रानाच्या मशागतीच्या कामांत गुंतले आहे.यंदा पाऊस वेळेवर येणार असल्याने खरीपपूर्व कामाला गती मिळाली आहे.कडक उन्हातही शेतकरी काम करीत आहेत.एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे उन्हाच्या तडाख्यात शेतीचे कामे चालू असल्याचे चित्र दिसत आहे.सद्य: स्थितीत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीपूर्व रानाच्या मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.यात शेतात बैल औताच्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी,पंजी करणे, शेणखत घालणे,पाळी मारणे,कसणं,तुराट्या वेचणे आदी कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!