विष्णूपंत कंटोले आणि उद्धव डोंगरे यांना काँग्रेसपक्षाची भावपुर्ण श्रद्धांजली
जालना (प्रतिनिधी) ः घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णूपंत कंटोले आणि जालना तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे निष्टावंत ज्येष्ठ कार्यकर्ते उद्धवभाऊ डोंगरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या दोन्ही मयत कार्यकर्त्यांना बुधवार रोजी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व. विष्णूपंत कंटोले आणि स्व. उद्धवभाऊ डोंगरे यांनी आपली संपुर्ण जीवन एकानिष्टेने व काँग्रेस पक्षाचे कार्य करून जनसेवा केली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाची हानी झाले असल्याचे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, अ. भा. काँ. चे सदस्य भिमराव डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी श्रद्धांजली अर्पित करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.