काँग्रेसचा आणखी एक निष्ठावंत काळाच्या पडद्याआड : विष्णुपंत कंटुले यांचे निधन
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन तौर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील काँग्रेस पक्षाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष विष्णुपंत सदाशिवराव कंटुले (वय – ५४) यांचे आज दुपारी २ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
हिंगोली जिल्ह्याचे खासदार संसदरत्न राजीवजी सातव यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसचे आणखी एक निष्ठावंत कार्यकर्ते विष्णुपंत कंटुले यांचे आज औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांचे अकाली निधन झाले,सत्ता असो वा नसो विष्णुपंत कंटुले काँग्रेस पक्षाशी 20 वर्षांपासून कायम एकनिष्ठ राहिले. अत्यंत शांत,संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व, राजकीय जीवनात वैचारिक भूमिका सोबत कुठलीही तडजोड न करणारे व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाने व तालुक्याने गमावले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता,त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारत होती पण महीनाभराच्या संघर्षानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्यावर सायंकाळी 8:30 वाजता कुंभार पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असे कुटुंबाकडून सांगण्यात आले..
यावेळी राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.