घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
Trending

बाणेगावातील शिंदे परिवाराला समृद्धीकडून आर्थिक मदत

बाणेगावातील शिंदे परिवाराला समृद्धीकडून आर्थिक मदतबाणेगावातील शिंदे परिवाराला समृद्धीकडून आर्थिक मदत



घनसावंगी : बैलपोळा सणाच्या दिवशी बैलजोडी धूत असताना पाय घसरून बानेगाव येथील ऊसतोड कामगार शिवाजी शिंदे (वय ४८ ) यांचे गोदावरी नदीत अपघाती निधन झाले.

images (60)
images (60)

त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवला. शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबाला समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी आधार दिला आहे.

घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथील शिवाजी शिंदे व त्यांचा परिवार ऊसतोडी करतात. त्याचं कुटुंब दरवर्षी ऊसतोडी करून उदरनिर्वाह करत. ऊस तोडीसाठी घेतलेल्या बैलांना बैलपोळा सणानिमित्त गोदावरी नदीकाठी धूत असताना त्यांचा पाय घसरून गोदावरी नदीत तोल गेला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण बाणेगावावर शोककळा पसरली. सर्व गावातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. याची माहिती गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांना दिल्यानंतर या दुःखदायी परिस्थितीत शिंदे कुटुंबाला धीर देण्यासाठी सतीश घाटगे यांनी बाणेगावात जाऊन शिंदे परिवाराचे सांत्वन करून धीर दिला. तसेच त्यांना आर्थिक मदतही केली. तसेच येणाऱ्या काळातही मदतीची गरज लागल्यास संपर्क करण्याचे शिंदे कुटुंबातील सदस्यांना सांगितले. यावेळी गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!