घनसावंगी तालुका
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने नागरिक हैराण
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोना संकटाने घायाळ झालेल्या नागरिकांना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीने धक्के सहन करावे लागत आहेत.सध्या पेट्रोल दर १०० रु.९२ पैसे प्रति लीटर असून,डिझेललाही एका लिटरसाठी ९० रुपये मोजावे लागत आहे.कोरोना आपत्तीला तोंड देत असताना पेट्रोल, डिझेल, गॅस,खते दरवाढीचा भडका उडत आहे.कोरोना महामारीत सर्वसामान्य माणूस संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले आहे.या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागत आहे.इथेनाल मिळाल्यानंतरही दर तेच असतील तर शासनाने लावलेला कर कमी करावा, अशी भावना सामान्य नागरिकांतून येत आहे.