वनविभागाच्या दुर्लक्षामुळे कुंभार पिंपळगाव परीसरात अवैध वृक्षतोड
कुंभार पिंपळगाव परीसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून अशा प्रकारे विनाक्रमांक ट्रॅक्टरने वृक्षतोड वाहतूक सुरू आहे.(छाया.कुलदीप पवार)
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव आणि परीसरात बेसुमार अवैध वृक्षतोड सुरू आहे.राजरोस वृक्षतोड सुरू असताना वन विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कुंभार पिंपळगाव आणि परीसरात राजाटाकळी,शिवणगाव, गुंज,भादली,जांबसमर्थ, धामणगाव,उक्कडगाव आदी गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणात वनराई होती.मात्र या भागातील आंबा,चिंच,बाभूळ,लिंब,साग इ.शेकडो झाडांची बेसुमार तोड करण्यात आली.विशेष म्हणजे विनाक्रमांक ट्रॅक्टरने खुलेआम वाहतूक सुरू आहे.वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.याबाबत कारवाई करण्यास वनविभाग उदासीन असल्याचे दिसत आहे.सध्या कुंभार पिंपळगाव सह परीसरात बेसुमार अवैध वृक्षतोड सुरू आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई मोहीम हाती घ्यावी अशी मागणी होत आहे.