जालना जिल्हा

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त,निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिज्ञानिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिज्ञा

            जालना, दि.21: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी  केशव नेटके  यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.

images (60)
images (60)

            यावेळी  नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, संदीप देवडे, राजेंद्र शिंदे, रवी कांबळे, रविंद्र हेलगड, श्री. पापुलवाड, श्री. जोशी, श्री. गिरी, श्री. वाल्हेकर, श्री. सातव, श्री. मिसाळ, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा

“आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या
परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व
हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये
शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी
जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.”

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!