घनसावंगी तालुका
व्यापाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करावी – तहसीलदार नरेंद्र देशमुख
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि. २० मे ३१ मे पर्यंत घनसावंगी तालुक्यात कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील किराणा,सर्व बँक, मेडीकल स्टोअर्स,दुकानात काम करणारे व्यक्ती यांंनी कोरोना तपासणी करून घ्यावी.व व्यापाऱ्यांची आस्थापने सुरू असताना रिपोर्ट सोबत ठेवावे असे आवाहन घनसावंगीचे नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.या आदेशाची अमंलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदे अंतर्गत कारवाई चा इशारा तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिला आहे.