आज वर अनेक वेळा या सशक्त महाराष्ट्रावर साथीच्या रोगाने झडप घातलेली आपण पाहिली.त्यात प्लेग असेल,स्वाईन फ्लू असे किती तरी विषाणू आले व त्याचा मुकाबला करण्यात आपल्याला त्या -त्या परस्थितीत यश ही आले.पण गेल्या मार्च पासून सुरू झालेला कोरोना या संकटाचा सामना आपण दुस-या वर्षात दुस-या लाटेत ही करत आहोत.त्यात अजून तज्ञाकडून कळतयं की तिसरी लाटही येऊ शकते.या कोरोना ने अनपेक्षित धक्के देत आपल्या परिचयातील,जवळच्या लोकांचे जीव हिरावून नेले.
दिवसेंदिवस वाढणारी रूग्न संख्या,भिती,आरोग्य यंत्रणेची होणारी तारांबळ,अपुरे आॅक्सिजन प्रमाण,रेमडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा या व अशा अन्य सोशल मिडीयावरील बातम्याने पाॅझिटीव्ह पेशंट व्हायरस ने कमी पण धास्तीने जास्त सिरीयस होतो.या संकट काळात धैर्याने काही सामाजिक संघटना,काही व्यक्तींनी समोर येऊन त्यांना शक्य होईल मदत केली व करत आहेत.एखादा व्यक्ती जर कोरोना पाॅझिटीव्ह निघाला तर सर्वप्रथम त्यास धीर देण्याची,कोरोना हा सर्दी,पडशासारखाच बरा होणारा आजार आहे.हे पटवून देणं गरजेचे.तुम्ही दिलेली सहानुभूती ही सुध्दा गोळ्या औषधी इतकंचं महत्वाचं काम करते.हे दुर्लक्षित करुन चालणार नाही.सध्या प्रशासन,आरोग्य यंत्रना,पोलिस खाते पाहिजे ती खबरदारी घेत आहे.फक्त गरजेचे आहे आपण त्यांना साथ देण्याची.कोरोना हा विषाणू जात,धर्म,वर्ण,गरीबी,श्रीमंती,या गोष्टी न पाहता कुणालाही यांचा संसर्ग होतो.त्या मुळे प्रत्येकांनी प्रत्येकांची काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.आपलं घर,आपली गल्ली,आपला प्रभाग,आपलं गाव,आपला तालुका,आपला जिल्हा हा कोरोनामुक्त कसा होईल यांची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे.आपण आधी आपल्यापासून सुरूवात केली की,आपलं तत्व,विचार सर्वांपर्यंत पोहचतो.आपण निवडून दिलेले काही लोक प्रतिनिधी ही स्वता:चा जिव धोक्यात घालून काम करत आहेत.त्यात प्रामुख्याने पारनेरचे राष्ट्रवादी काॅगेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांचे नाव घेता येईल.निलेश लंके सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात भाळवणी या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर या संकल्पनेतून आमदार निलेश लंके साहेबांनी 1100 बेडचे ज्यात 100 आॅक्सिजनचे बेड आहेत.असे भव्य दिव्य कोविड सेंटर उभारले.सध्या सर्वत्र त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असून महाराष्ट्र या जिगरबाज आमदाराचे काम पाहत आहे.निलेश लंके साहेबांनी फक्त तालुक्याच्याच नव्हे तर जो कोणत्याही तालुक्याचा,जिल्ह्याचा,कोणत्याही पक्षाचा अगदी कुणीही पाॅझिटीव्ह पेशंट येवो.त्यांना आधार देणं,योग्य उपचार देणं,त्यास या संकटात धीर देऊन कोरोना वर मात करून त्यास ठणठणीत बंर करून घरी पाठवणं याच ध्येयाने लंके साहेब सतत कार्यमग्न असतात.आज आमदार म्हटलं तर सर्वसोयीयुक्त गोष्टी आल्या,लोकांचा गराडा,मोठ मोठ्या गाड्या आल्या,सोबत अंगरक्षक आले, पण हा भल्ला माणूस चक्क त्या कोविड सेंटर मध्येच जेवतो,झोपतो.ना गाजाबाजा न बडेजाव पणा,रूग्नांची काळजी घेत रात्री अपरात्री स्वत:राऊंड मारत कुणाला काही त्रास होत नाही ना,कुणाला पाणी,औषध काही लागत नाही ना या गोष्टी लंके साहेब स्वत:जातीने लक्ष देतात.प्रत्येक रूग्नांसाठी स्वतंत्र थर्मास,मास्क,स्टिमर,नॅपकीन,पाणी बाटली,साबण,24 तास पिण्यासाठी,अंघोळीसाठी,वापरण्यासाठी गरम पाण्याची सोय.आदी मुलभूत सुविधा दिल्या जात आहेत.सकाळी योगा प्राणायम,सोबत नाष्ट्याला ड्रायफूट यासोबतच सकस आहार ज्यामध्ये दूध,अंडी,सूप,फळे या गोष्टीचा समावेश करतात.वैद्यकीय आधिकारी,डाॅक्टर्स यांंच्या सल्ल्यानुसार रूग्नांना आयुर्वेदिक काढे दिले जातात.लंके साहेबांचं रूग्नांना आपुलकीने जेवण केलं का?विचारणं,आस्थेने औषध देत काळजी घेणं,या गोष्टीने पेशंटची रोग प्रतिकारक शक्ती वाढतेय हे नक्की.गोळ्या औषधाचा डोस व निलेश लंके साहेबांनी घेतलेली काळजी या गोष्टीने पेशंट लवकर बरे होत आहेत.कोरोना झाला म्हणजे माणूस भितीपोटी जास्त भावनिक होऊन विचार करू लागतो.त्यात जर जवळचे कुणी कोरोनाने गेले.तर तो आधिक चिंताग्रस्त होतो.या कोविड सेंटर मधील वातावरण ही सकारात्मक व प्रसन्न राहवं.पेशंटला काही वेळ का होईना कोरोना व्यतिरिक्त चांगलं काही कानावर पडावं म्हणून करमणूक म्हणून काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.ज्यात जादूचे प्रयोग,हिंदी मराठी गीते,भक्तीगीताची सुरेख मैफिल,कीर्तन अशा कार्यक्रमातून कोविड पेशंटच्या मानसिकतेत बदल होतो.तो पोटभर जेवन व दिलेल्या गोळ्या औषधाला प्रतिसाद देऊ लागतो.लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो.त्यांच्या संकटसमयी जर तो उपयोगी पडत नसेल तर तो लोक प्रतिनिधी काय कामाचा?मी जरी असुरक्षित असलो तरी माझी जनता सुरक्षित असली पाहिजे हा परखड विचार निलेश लंके साहेबांचा.स्वता:ची काळजी न घेता,मास्क न लावता लंके साहेब पेशंटची काळजी घेतात.त्यांचे आॅक्सिजन लेवल चेक करणे,खोकला येत असेल तर औषध देणे,या गोष्टी लंके साहेब न भिता न घाबरता करतात.त्यांना विचारलं साहेब तुम्हाला भिती नाही का वाटत.तर ते म्हणतात.”आपलं काय व्हायचं ते होऊ द्या मी जर भितीने घरात बसलो तर लोकांनी कुणाच्या दारात बसायचं.अशी लोकांर्पण भावना घेऊन लंके साहेब कार्य करतात. लंके साहेबांच्या या कार्यांचा इतर लोकप्रतिनिधी नी आदर्श घ्यावा.ही माफक अपेक्षा.प्रंचड ऊर्जेने व न थकता न थांबता लंके साहेबांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद व प्रशंसनिय आहे.कारण आपली संस्कृती सांगते चांगल्या कामाचं कौतुक व्हायलाच हवं.सर्वसामान्यांच्या आजाराची दखल घेणारे आमदार निलेश लंके म्हणजे त्या कोविड सेंटरचे जणू आॅक्सिजन झालेत.साहेब तुम्ही ही स्वता:ची काळजी घ्या.सर्वसामान्य कुटुंबातून येऊन चहाच्या हाॅटेलपासून सुरू केलेला हा राजकिय प्रवास भविष्यात तुम्हाला मंत्रीपदापर्यंत नेईल हा विश्वास वाटतो.तुम्ही हाती घेतलेल्या या समाज कार्यास मनापासून सॅल्यूट…!
लेखक-आविनाश माळवदे
मो.नं.7720099250