जालना जिल्हा

जालना: केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार जून महिन्यांचे राशन

केशरी शिधापत्रिका धारकांसाठी जुन महिन्यासाठी चे गहू व तांदळाचे नियतन मंजूर

images (60)
images (60)

        जालना दि.28 :- कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जुन 2021 करिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा शासनाकडुन निर्णय घेण्यात आलेला असुन शासनाचे पत्र दि.25 मे 2021 नुसार सदर लाभार्थ्यांसाठी गहू व तांदुळाचे नियतन मंजुर करण्यात आलेले आहे.

     जालना जिल्हयातील एपीएल (केशरी ) 147544 योजनेच्या लाभार्थ्यासाठी 3459.10  क्विंटल गहू व 2357.40 क्विटल तांदुळ असे एकुण 5816.50 क्विंटल अन्नधान्य नियतन मंजुर करण्यात आलेले आहे. प्रति लाभार्थी एक किलो या प्रमाणात गहु व तांदूळ नियतन देण्यात येणार असून सदर धान्य सवलतीच्या दराने गहू 8 रुपये प्रति किलो  व तांदुळ 12 रुपये प्रतिकिलो दराने वितरीत करण्यात येणार आहे.

या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी धान्य रास्तभाव दुकानांमध्ये खरेदी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!