शिवनगांव येथे कृषी विभागाच्या वतीने बीजप्रक्रिया मोहीम
घनसावंगी प्रतिनिधी : नितीन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव व कुंभार पिंपळगाव येथे आज शनिवार (ता.29)रोजी कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे व तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात आली.
यावेळी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करुन शेतकऱ्यांना दाखविण्यात आले, उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक पांडुरंग देठे व,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक मुरलीधर गाढवे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, सुरवातीला सोयाबीन उगवण क्षमता तपासून नंतर त्यावर बीज प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना सुरवातीला रासायनिक प्रक्रिया करावी त्यामध्ये प्रथम बुरशीनाशक (थायरम), कीटक नाशक (गाउचो ) नंतर जैविक बीज प्रक्रिया (रायझोबियम, पीएसबी) करावी असे सांगितले त्याच पद्धतीने त्यांनी बीजप्रक्रिया चे फायदे जसे की जमीनीतून व बियाण्याव्दारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो,बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात, पिकाच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ होते, जमिनीचे आरोग्य सुधारते तसेच बिजप्रक्रीया साठी खर्च कमी येतो याबद्दल सविस्तर माहीती दिली, त्या नंतर बी बी एफ तंत्रज्ञान ने कशी पेरणी करावयाची व बी.बी.एफ वापरामुळे होणारे फायदे ,सोयाबीनची पेरणी जोड ओळ पध्दतीने कशी करावी व त्यांचे फायदे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच अशोक तौर ,राम तौर ,शिवनगांव चे कृषी सहाय्यक शंकर गव्हाणे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक दिपक पवार,विशाल देसले ,किरण घादगीने, व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.