जालना क्राईमजालना जिल्हा

जालना:सिनेस्टाइल भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून पळविली चारचाकी;आरोपी दोन तासात पोलिसांच्या जाळ्यात

परतूर तालुक्यातील भरदिवसा घडली घटना

घनसावंगी प्रतिनिधी : सेलूकडून आष्टीकडे चारचाकी वाहनाने येणाऱ्या इसमास बदुंकीचा धाक दाखवून मोबाईल, पाकीटसह गाडी पळविल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील हास्तूरतांडा पाटीजवळ घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी दोन तासात छडा लावला असून, एका आरोपीस अटक केली आहे. बद्रीनाथ प्रभाकर घुगे (२३ रा. टाके ढोणगाव ता. अंबड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

images (60)
images (60)

आष्टी येथील बळीराम टेकाळे रविवारी दुपारी चारचाकीने सेलू (ता. परभणी) येथून आष्टीकडे येत होते. सेलू ते आष्टी रोडवरील हास्तूरतांडा पाटीवर आल्यावर एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी थांबविली. गाडीचा दरवाजा उघडून एकाने डोक्याला बंदुक लावून मोबाईल व पाकीट घेऊन टेकाळे यांना उतरून दिले. त्यानंतर एकजण गाडी घेऊन फरार झाला.तर दोघे हे मोटर सायकल वरून फरार झाल्याची माहिती टेकाळे यांनी आष्टी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली.वायरलेस वरून , घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, अंबड, माजलगाव येथील पोलिसांना याची माहिती दिली. कुंभार पिंपळगाव येथील अंबड- पाथरी मार्गावर पोलिसांनी चोरीची चारचाकी व संशयित आरोपी बद्रीनाथ प्रभाकर घुगे याला पकडले.

त्याच्याकडून चारचाकी, एक बंदुक, पाकीट व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस जिल्हा अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. सुभाष सानप, पोका. अमोल तिबुले, पोका. सुरज चरावंडे, कुंभार पिंपळगाव चौकीचे पोउपनि शिवशिंग बहुरे, पोहे का भागवत हरीशचंद्रे,पोहे रामदास केंद्रे, पोहो एस कुंटे सह आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!