महाराष्ट्र न्यूज

वीज कंत्राटी कामगारांना दिलासा, कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच राहतील

जालना:प्रतिनिधी

images (60)
images (60)

राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने विविध आंदोलने मागील 11 महिने केली होती. 15 डिसेंबर 2020 रोजी आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सह सचिव मा.उद्धव वाळुंज यांनी संघटनेला मिटिंग चे आश्वासन दिले होते त्या नुसार मंगळवारी 1 जून 2021 रोजी ही व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग झाली.

बांद्रा कोर्टाचे आदेश व त्यातील कामगारांची लिस्ट सर्व सर्कल ऑफिसला पाठवली असून,कोर्ट केस मधील कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच राहतील, कामगाराला कमी करायचा अधिकार इंजिनियर कडे राहील, तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना कोरोना काळाच्या गैरहजेरीचा पगार दिला जाईल, सॅनिटायझर साठी 1000 रुपये मुंबई मुख्यालयातील कामगारांना दिले जातील, टेंडर वेळेवर काढले जातील कामगाराने कळवलेल्या बँक खात्यात पगार दिला जाईल, नोकरी साठी अथवा पगारातून पैसे मागणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जातील, परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल.

जॉब सिक्युरिटी,भरती मध्ये प्राधान्य, आरक्षण, वयात सवलत, मृत व अपघात ग्रस्त कामगारांना आर्थिक मदत, वारसाला नोकरी, मेडिक्लेम, इत्यादी विषय हे धोरणात्मक असल्याने प्रलंबित असून संघटना पाठपुरावा करत आहे तरी या बाबत ऊर्जामंत्री स्तरावर मिटिंग होईल. इतर समस्यासाठी लवकरच कंपनी निहाय स्वतंत्र मिटिंग संघटने सोबत घेतली जाईल असे प्रधान सचिवांनी सांगितले.

मा.प्रधान सचिव उर्जा तथा महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मा. दिनेश वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षते खाली ही मिटिंग झाली. मिटिंग मध्ये महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल साहेब , मानव संसाधन विभागाचे संचालक मा. भालचंद्र खंडाईत व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा संजय ढोके, महानिर्मिती कंपनीचे मानव संसाधन विभागाचे संचालक मा. भीमाशंकर मंता, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे इत्यादी उपस्थित होते व संघटनेच्या वतीने अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव , संघटनमंत्री राहुल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!