जालना जिल्हा

25 जुन रोजी डाक अदालतीचे आयोजन

     जालना :-    देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक-  आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरीकांच्या मनामध्ये अपरोक्षपणी पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देतांना, संभाषणामध्ये, पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींची योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले असुन  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई द्वारे दि. 25 जुन 2021 मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई 400 001 यांच्या कार्यालयामध्ये 115 ची डाक अदालत आयोजित करण्यात आली असल्याने मुख्य पोस्ट मास्तर.

images (60)
images (60)

     महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या, तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिका-यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.

     संबंधितांनी डाकसेवे बाबतची आपली तक्रार सहायक निदेशक एच.एम. मंजेश डाकसेवा ज.शि. आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई -400 001 यांचे नावे दोन प्रतीसह दि. 10 जुन 2021 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाइट www.maharashtrapost.gov.in  वर उपलब्ध असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सक्रिल मुंबई  यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!