कोरोना साथीच्या तिस-या लाटेची पुर्वीचे तयारी सुरु.
बबनराव वाघ, उपसंपादक
जालना :- आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या व जिल्ह्यात होणा-या प्रसुतींच्या आकडेवारीच्या प्रमाणात संभाव्य कोरोना लाटेमध्ये बालकांच्या संसर्गाची शक्यता व त्या अनुषंगाने उपचारासाठी लागणारी औषधे, खाटा, उपकरणे, साधान सामुग्री व प्रशिक्षित मनुष्यबळाची संख्येबाबत अवगत केले आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी जालना व इतर अधिकारी यांच्या सोबत दि. 7 जुन 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या बाबतचा आढावा घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांना या पार्श्वभुमीवर तयारी करण्यास सांगितले.
लोकसंख्या व प्रसुती त्यानुसार अपेक्षीत रुग्ण संख्येच्या आधारे लागणारी खाटांची संख्या जिल्ह्याची लोकसंख्या 2.1 दशलक्ष, एकुण प्रसुती संख्या मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत 34 हजार 977, नवजात शिशुसाठी कोरोना व्यतिरिक्त आजारांसाठी आवश्यक खाटा दर हजारी 4 प्रमाणे 140, नवजात शिशुसाठी संसर्गासाठी आवश्यक खाटा दर हजारी 4 प्रमाणे 140, प्रसुती पश्चात कोरोना संसर्ग मातांसाठी आवश्यक खाटा दर हजारी 8 प्रमाणे 280, कोरोना संसर्गात बालकांसाठी लागणारे ऑक्सिजन खाटा प्रति दशलक्ष किमान 200 प्रमाणे 420, कोरोना संसर्गात बालकांसाठी लागणारे अतिदक्षता खाटा PICU प्रति दशलक्ष किमान 3 प्रमाणे 63,
यानुसार शासकीय व खाजगी संस्थेमध्ये खाटांची केलेली तयारी नवजात शिशुसाठी संसर्गासाठी आवश्यक खाटा दर हजारी 4 प्रमाणे 145, नवजात शिशुसाठी कोरोना संसर्गासाठी आवश्यक खाटा आवश्यक खाटा दर हजारी 4 प्रमाणे 145,प्रसुती पश्चात कोरोना संसर्ग मातांसाठी आवश्यक खाटा दर हजारी 8 प्रमाणे 260, कोरोना संसर्गात बालकांसाठी लागणारे ऑक्सिजन खाटा प्रति दशलक्ष किमान 200 प्रमाणे 420, कोरोना संसर्गात बालकांसाठी लागणारे अतिदक्षता खाटा PICU प्रति दशलक्ष किमान 3 प्रमाणे 75.
यासाठी लागणारी औषधी, व्हेंटीलेटर्स, इतर व उपकरणे व साहित्य सामुग्री उपलब्धतेबाबत तयारी करण्यात आलेली आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळ जसे की, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेस, स्वच्छता व सफाई कर्मचारी उपलब्ध असुन त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे, जेणेकरुन या संसर्गाच्या उपचारासाठी तज्ञ, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.