जालना जिल्हा

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज नियमितरित्या सुरु

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना :-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जालना येथील कार्यालयीन कामकाज 100 टक्के कर्मचा-यांच्या क्षमतेने  सुरु करण्यात आले असुन जिल्हातील सर्व नागरीकांना असे कळविण्यात येत आहे.

       शिकाऊ अनुज्ञप्ती  व पक्के अनुज्ञप्ती विषयक कामकाज, अनुज्ञप्ती नुतनीकरण, पत्ता बदल, दुय्यमप्रत, आय.डी.पी. इत्यादी प्रकारातील सर्व कामे. वाहन नोंदणी, हस्तांतरण, कर्ज बोजा उतरविणे, चढविणे, नोंदणी प्रमाणपऋ, दुय्यम प्रत, पत्ता बदल, नोंदणी नुतनीकरण, परवाना विषयक सर्व कामकाज. खटला विषयक सर्व कामकाज. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज.

     या सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाचे संकेत स्थळावरुन विहीत शुल्क भरुन ऑनलाईन अपॉईमेंट घेऊन  अपॉईमेंटच्या दिवशी कागदपत्रे सादर करण्यासाठी कार्यालयात यावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!