कुंभार पिंपळगाव: आजपासुन अंबड आगाराची अंबड ते लातुर बससेवा सुरू;चालक व वाहकांचा ग्रामस्थांकडून सत्कार
कुंभार पिंपळगाव:अंबड आगाराची अंबड ते लातुर ही बस सुरू करण्यात आली.यावेळी चालक व वाहकांचा सत्कार करताना ग्रामस्थ.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
आजपासुन अंबड आगारातील अंबड ते लातुर बससेवा ग्रामस्थ, व्यापारी, व प्रवाशीसाठी सुरू करण्यात आली आहे. या बसचा कुंभार पिंपळगाव बसस्थाथकात आगमन होताच चालक बी.पी.गाडगे व वाहक डी.टी.सावध यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बापुसाहेब आर्दड,अशोकराजे जाधव,रमेश तौर,भिकाजी थोरात,कालीदास राऊत, सुरेश राठोड, पञकार गणेश ओझा,गणेश टेकाळे यांची उपस्थिती होती. ही बस सकाळी अकरा वाजता अंबडहून सुटणार आहे. ही बस अंबड,घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, आष्टी, माजलगाव,धारूर,आडस अंबाजोगाई,मार्गे लातुरला पोहोचेल.तर दुसऱ्या दिवसी सकाळी सात वाजता लातुरहुन निघेल व अंबडला पोहचेल.ही बससेवा पुर्ववत सुरू झाल्याने ग्रामस्थ,व्यापारी, व प्रवाशांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.