घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यात खते व बियाणांची चढ्या भावाने विक्री : कृषी केंद्राबाहेर भावफलक लावण्याची मागणी

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असून विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.

कृषी केंद्र चालक मनमानीने किंमती आकारून खत,बियाण्यांची विक्री करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मात्र चुना लागत आहे.यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेत पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापसू, तूर,मुग लागवडीसह सोयाबीन आदी पिकांची आता पेरणी चालु केली आहे.मृग नक्षत्रात पडलेला पाऊस खरीप पिकाला जादा उपयुक्त समजला जातो. त्यामुळे मिळेल त्या भावाने बियाणे, खते घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असते. त्याचाच लाभ घेत तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक अधिकची मागणी असलेल्या सोयाबीन बियाणांच्या एका बॅग मागे ६०० ते ७०० रूपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे.  ज्या बियाण्यांना कृषी केंद्रात विक्री करायची परवानगी नाही, असेही बियाणे दुकानदारांकडून विक्री केले जात असल्याचा संशय आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉकबुकही उपलब्ध नसते. सध्या युरिया खताचा तुटवडा असल्याचे कृषी केंद्र चालक सांगत सुटले आहेत. तसेच काही कृषी केंद्र चालक अजूनही चढ्या भावाने बियाण्यांची विक्री करीत आहे व शेतकऱ्यांना कच्चे बिल देण्यात येत आहे. मात्र त्यांची जादा भावामुळे फसगत होत आहे. त्यातच अनेक शेतकरी उधारीवर बियाणे, खते घेत असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत चढ्या दराने बियाणे, खते विकत घ्यावे लागत आहे.यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकांना केंद्राबाहेर भाव फलक लाऊन कशाचा किती साठा आहे याची माहीती नोटीस बोर्ड वर लावावे व असे न केल्यास कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.

(प्रतिक्रिया)
राम रोडगे(तालुका कृषी अधिकारी)
तालुक्यातील कृषी केंद्राची तपासणी केली जाईल व तपासणी दरम्यान कृषी केंद्राला घालून दिलेल्या नियमात एखादे केंद्र आढळले नाही तर सदर केंद्राच्या चुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही केली जाईल तसेच शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून बिले घ्यावी व एम आर पी पेक्षा अधिकच्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराची कृषी विभागात लेखी स्वरूपात तक्रार करावी.

(प्रतिक्रिया)
अंकुश कंटूले(शेतकरी)
कुंभार पिंपळगाव येथील दुकानदाराकडे चढ्या दराने विक्री करायला बियाणे आहे मात्र सर्वसामान्य कष्टकरी अन्नदाता बळीराजा दुकानावर गेला की स्टॉक संपला आहे पण दुसरीकडुन तुम्हाला मागवून घेतो मात्र शिल्लक पैसे द्यावे लागतील असे सांगून काहींच्या घरी तरी काहींनी दुसऱ्या गोडाऊन ला बियाणे लपवून ठेवले आहे ते च बियाणे देऊन अधिकचे पैसे घेतले जात आहेत तसेच काही अधिकाऱ्याचे दुकानदारासोबत साटेलोटे आहे की काय असा सवाल निर्माण होत असून फोन लाऊन तपासणी होणार सतर्क रहा असे दुकान दारांना सांगितले जात असल्याची शंका आमच्या मनात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!