घनसावंगी तालुका

शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग


कुंभार पिंपळगाव शेतशिवारातील चित्र

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परीसरातील शेतशिवारात सध्या शेतकऱ्यांची खरीप पेरणींची लगबग सुरु झाली आहे.परीसरातील राजाटाकळी,राजुकरकोठा,शिवनगाव,भादली,जांबसमर्थ परीसरात गत दोन दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली.यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीसाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.या नक्षत्रामधील पेरणी उत्तम असुन चांगले उत्पादन होत असल्याचे जुने जाणते शेतकरी सांगतात.पाऊस पडल्यामुळे शेतकरी वखरपाळी,काडीकचरा वेचणे, कपाशी,तुरीची लागवड करण्यासाठी फुल्पा पाडणे आदी कामात मग्न आहेत.बाजारात बी-बियाणे खरेदीसाठी दुकानात जाऊन चाचपणी करीत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमुळे बाजारपेठ गजबजून गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!