कुंभार पिंपळगाव येथील महावितरण उपकेंद्राकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या कामांना सुरूवात
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महावितरण उपकेंद्राअंतर्गत येथील सहाय्यक अभियंता प्रदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व कामांना आज (दि.१५) मंगळवार पासून सुरूवात करण्यात आली.
कुंभार पिंपळगाव परीसरात अरगडे गव्हाण,राजाटाकळी,जांबसमर्थ,मुर्ती, धामणगाव,लिंबी,कोठाळा,घाणेगाव,विरेगाव तांडा,राजुरकर कोठा,नाथनगर,आदी भागात मान्सून पूर्व कामाला सुरुवात झाली.येत्या पावसाळ्यात परीसरात विद्युतपुरवठा खंडीत होऊ नये,यासाठी ‘महावितरण’ चे कर्मचारी मान्सून काळात अविरत सेवा देण्यासाठी एकवटले आहेत.
यात प्रामुख्याने उपकेंद्राअंतर्गत देखभाल दुरुस्ती,साफसफाई, झुकलेले विद्युत खांब सरळ करणे,लोंबकळणाऱ्या तारा ओढणे,तारेखालील झाड तोडणे,आदी महत्वपुर्ण कामे पूर्ण करण्यात येत आहे.यासाठी लाईनमन एस.टी.पवार,ए.एस.राठोड, कर्मचारी दिनकर हिवाळे,एन.सी.सुराशे,पी.एस.साबळे, गजानन शिराळे, सचिन शिंदे,गुत्तेदार सखाराम पांढभरे, प्रवीण गजभार, प्रदीप हत्ते, योगेश चौधरी, दत्ता भोपाळ आदी परीश्रम घेत आहे.