जालना जिल्हा

जाफराबाद येथे पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार सरंक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करा


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

images (60)
images (60)

सिंदखेडराजा प्रतिनिधी
जाफ्राबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना सिंदखेडराजा तालुका यांच्या वतिने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.तसेच हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.पत्रकारांना विचार स्वतंत्र,लेखन स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.संमृद्ध लोकशाहीसाठी सरकारच्या कामाची,राजकीय तथा सामाजीक नेत्यांच्या भूमिकांची समिक्षा करणाऱ्या पत्रकारांची देशाला गरज आहे. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाहीवरील हल्ले ठरतात.
अशा हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज दि.१५ जून रोजी एका निवेदनाद्वारे सिंदखेडराजा तहसीलदार यांना करण्यात आली.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, मनसे तालुकाध्यक्ष निलेश देवरे, महेंद्र पवार, घनश्याम केळकर, अभिजित देशमुख, अंबादास डिघोळे, अंकुश चव्हाण, भागवत राजे जाधव, पवन राजे जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!