घनसावंगीत युवासेनेच्या वतीने ना.आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
घनसावंगी येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आदित्य जनसेवा सप्ताह’ अंतर्गत विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान घनसावंगी येथे दि.२० रविवार रोजी ग्रामीण रूग्णालयाच्या परीसरात वृक्षारोपण,कोरोना योद्धांचा सत्कार,व रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण,युवासेना विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख उद्धव मरकड,भरत सांबरे, अंकुश पाचफुले, अमोल ठाकूर, गणेश काळे,अजय कदम, गणेश मोहिते, पंढरीनाथ उगले, संतोष जाधव,सागर पवार, दिलीप वाडेकर, चंद्रकांत बहिर,राज घोगरे, अमोल आधूडे,शुभम कोरडे, संभाजी भालशंकर, गोपाल तांगडे, राहुल कणके,शैलेश कुढेकर, दिलीप कागदे,केशव ढेरे,आदिराज ठोकळ, तालेब भाई यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.