सिंदखेड राजा येथे आशा व गटप्रवर्तक सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा व निवेदन सादर.
रविंद्र शिंदे(सिंदखेड राजा)
दि,22 जून 2021 रोजी सिंदखेड राजा येथे पंचायत समिती व तहसील कार्यालयावर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा मोठ्या संख्येने मोर्चा काढून बी,डी, ओ, व तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन सादर ककरण्यात आले.
निवेदनाद्वारे म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यात कोविड-19 प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करून,सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे,या मध्ये आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा समावेश करण्यात आला आहे,या मोहिमेत यांनी घरोघरी जाऊन महत्वाची कामगिरी बजावली आहे,रोज 7ते8 तास काम करावे लागत आहे ,करीता शासनाने इतर आरोग्य कंत्राटी कर्मचारी या प्रमाणे आम्हाला ही शासकीय सेवेत कायम करून आशा सेविका यांना प्रति महिना 18000/ व गटप्रवर्तक यांना 22000/ वेतन देण्यात यावे,प्रतिमाच समान भत्ता देण्यात यावा,केलेल्या कामाचा थकीत मोबदला देण्यात यावा,अशा अनेक मागण्या करून , बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देन्यात आला,शासनाने कृती समितीचे बैठक घेऊन योग्य तो निर्णय लावावा व न्याय देण्यात यावा असे या निवडनद्वारे म्हंटले आहे.
या प्रसंगी सौ,एस,जी,जाधव,आर,एम,जायभाये, एस,एन,सपकाळ,सुमित्रा लिहिणार,सरिता धोंगडे,ज्योती देशमुख,सविता सांगळे उर्मिला बुरकुल लता बंगाळे उपस्थित होत्या.