महाराष्ट्र न्यूज

वारकऱ्यांना अटक करणारे हे औरंगजेबाचे सरकार – माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा घणाघात

तिरुपती बालाजी देवस्थान’ दर्शनासाठी खुले मग पंढरपुर का नाही? – लोणीकर यांचा सवाल

ह.भ.प. बंडातात्या कराडकर व हभप रमेश महाराज वाघ यांच्यासह वारकऱ्यांना अटक करून सरकारने महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या – लोणीकर

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

images (60)
images (60)

महाराष्ट्र हे संतांची भूमी म्हणून अखंड धर्तीवर प्रसिद्ध असलेलं राज्य आहे संत महात्म्याची अत्यंत मोठी अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे अनादी काळापासून लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडीमध्ये चालत जात असतात त्यात संतसम्राट श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी यासह लाखो वारकरी हजारो यांच्या माध्यमातून पंढरपूर कडे रवाना होत असतात अगदी रजाकार इंग्रज यांच्या काळामध्ये देखील ही परंपरा कधी खंडित झाली नाही सम्राट क्रूरकर्मा औरंगजेबाने मात्र एकदा अनेक वारकऱ्यांना तत्कालीन परिस्थितीमध्ये अटक करून वारकर्‍यांची पायी दिंडी रोखण्याचा एक असफल प्रयत्न केला होता परंतु त्याला देखील यश आले नाही आज महाराष्ट्रामध्ये असणार आपलं सरकार हे महाराष्ट्राच्या मातीतला सरकार आहे की औरंगजेबाचे सरकार आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आज पडला आहे. असा घणाघात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज सरकारवर केला.

पंढरपूरला पायी जाणारी प्रत्येक दिंडी आणि दिंडीतील प्रत्येक वारकरी हा अत्यंत शिस्तबद्ध व शांतताप्रिय मार्गाने विठुरायाचे ध्यान करत तल्लीन होऊन पंढरपूरला जात असतो आज ‘दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी देवस्थान’ दर्शनासाठी खुले आहे कोविडचे सर्व नियम पाळून त्या ठिकाणी दर्शनाची सुविधा केली आहे मग पंढरपुरात का नाही असा सवाल देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारला विचारला आहे

आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी मध्ये चालत जाणारेसमाज प्रबोधन कार प्रसिद्ध कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर, हभप रमेश महाराज वाघ आणि इतर सहकाऱ्यांना आज आळंदी च्या पुढे निघाल्या नंतर लगेचच एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे अटक करून पोलिसांच्या गाडीत बसून समस्त वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान करण्यात आला आहे सर्वप्रथम एक वारकरी म्हणून मी या घटनेचा जाहीर निषेध करतोया सर्व कीर्तनकार प्रवचनकार यांनी समाजप्रबोधनाचे खूप महान आणि महत्त्वाचे काम संपूर्ण महाराष्ट्रात केले आहे स्वच्छता अभियान, वृक्षलागवड, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, बेटी बचाव यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबतीत हे सर्व वारकरी बांधवांना कायम पुढाकार घेताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. या सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला नेहमीच नवीन दिशा मिळालेली आहे. महाराष्ट्रातील वारकरी मागील अनेक वर्षांपासून “निर्मल वारी” राबवून संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देत आहेत. असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

पंढरपूरला पायी चालत जाणार्‍या वारकऱ्यांना अशाप्रकारे अवमानकारकरित्या अटक याअगोदर फक्त औरंगजेबाच्या काळात झाल्या होत्या त्यानंतर ती हिंमत कुणीही केली नाही परंतु तोच निंदनीय प्रकार आज आपल्या सरकार मध्ये घडला आहे त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा जपणारे आणि जोपासणाऱ्या या वारकऱ्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं. वारी ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो वर्षापासून चालणारी परंपरा आहे, त्या पायी वारीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची जबादारी सरकारने घ्यावी. या वारकऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना व त्यांना याबाबत आदेशित करणाऱ्या लोकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

जोपर्यंत या वारकऱ्यांची सुटका केली जात नाही व अटक करणारे व त्यांना आदेशित करणारे यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत येणारे पावसाळी अधिवेशन आम्ही चालू देणार नाही… आपण स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहात त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना आपण नक्कीच समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो…असेही लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!