माजलगाव – जालना बस झाली सुरू; चालक वाहकाचा ग्राम विकास युवा मंच च्या वतीने सत्कार.

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
माजलगाव आगाराने नुकतीच माजलगाव – जालना हि बस सुरू केली.हि बस सकाळी माजलगाव,आष्टी, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, अंबड मार्गे जालना जाते त्यानंतर ती बस दुपारी त्याच मार्गे परत माजलगाव ला जाते.हि बस बीड व जालना या दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी माजलगाव आगाराने उपलब्ध करून दिली.त्या बद्दल येथील ग्राम विकास युवा मंच च्या वतीने हि बस दुपारी कुंभार पिंपळगाव मार्गे जात असताना त्या आगाराचे बस चालक डि.बि.वाहुळकर व वाहक बि.बि.थेटे यांचा सत्कार कुंभार पिंपळगाव बसस्थानकात करण्यात आला.या वेळी अंकुश कंटुले, वैभव कुलकर्णी, सिद्धेश्वर कंटुले, प्रशांत बुरसे, भागवत राऊत, दिनेश दाड,प्रताप कंटुले, महारुद्र गबाळे,अक्षय चांडक,पवन कंटुले, महावीर व्यवहारे,प्रकाश बिलोरे, अविनाश कंटुले,गोलु पाटील, माऊली उढाण, विठ्ठल काळे, विकास काळे, सचिन गुजर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.