महाराष्ट्र न्यूज

कृपाशंकर सिंह यांचा भाजपात प्रवेश, BMC निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का!

बबनराव वाघ/उपसंपादक

images (60)
images (60)

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह कॉंग्रेसचे दिग्गज नेते यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे.कॉंग्रेसला याचा फार मोठा फटका बसनणार असल्याचे चित्र दिसून येते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडनुकांपुर्वीच दिग्गज नेत्याने पक्ष सोडून जावे हे कॉंग्रेसला धोकादायक आहे.

उत्तर भारतीय समाजाचे नेते म्हणून कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत दबदबा ठेवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.

मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेत कृपाशंकर सिंह यांनी केंद्र सरकारचं कौतुक केले होते. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कृपाशंकर सिंह यांनी १० सप्टेंबर २०१९ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून कृपाशंकर सिंह भाजपात जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.अशातच त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ३ वेळा आमदार झालेले कृपाशंकर सिंह हे विलासराव देशमुख सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री पदी होते. त्याआधी विधान परिषदेचे सदस्यत्व त्यांनी भुषवले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!