महाराष्ट्र न्यूज

सारथी तारादूत करणार पुन्हा बेमुदत आत्मक्‍लेश आंदोलन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था सारथी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात असते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सारथी संस्थेचे महत्त्व समाजाला समजले .मंत्रिमंडळ स्थरावरून काही निर्णय पण झाले मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते याकडे लक्ष लागले आहे. आज नुसतेच सारथी संस्थेच्या तारादूतांनी ‘तात्काळ नियुक्ती’ मिळावी या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलनासाठी निवेदन दिले आहे.


छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती झाली. राष्ट्रपती राजवटमध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलनं केली छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली. १९ जून रोजी मा. अजितदादा पवार, छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली व मा. अजितदादा यांनी सारथी संस्थेच्या १३ मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या. परंतू सूचना देऊन १६ दिवस उलटूनही अद्यापर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तारादूतांवर दीड वर्षापासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास १५ जुलै पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलन विविध मराठा संघटना यांच्यासोबत करणार असल्याचे निवेदन मेल द्वारे सारथी कार्यालयाला दिले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!