जालना क्राईम

जालन्यात बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे खरेदी,विक्री प्रकरणी औषध व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

    जालना दि.10- अन्न व औषध प्रशासन जालना कार्यालयाच्या औषध निरीक्षक श्रीमती अंजली मिटकर यांनी दि. 29 जून  2021  रोजी  मे. रुबी  मेडिकल आणि जनरल स्टोअर, टाऊन हॉल, जालना या मेडीकलची तपासणी केली त्यावेळी सदर मेडिकलमध्ये  गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधी अवैधरित्या खरेदी करुन अवैध विक्रीकरता   विक्री साठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. सदर  औषधी साठ्याचे  कोणतेही खरेदी बिल/पुरवठादाराचा तपशील आढळून आला नाही .

images (60)
images (60)

तसेच दुकानात उपलब्ध एमटीपी किट च्या स्ट्रीप वर उत्पादकाचे बॅच क्रमांक,  उत्पादन दिनांक आणि एमआरपी नमुद नसल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर मेडिकलचे मालक तथा नोंदणीकृत फार्मासिस्ट मोहम्मद जावेद यास संधी देऊन सुद्धा त्याने सदर औषधींचा उत्पादन खरेदी स्त्रोत किंवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे  नाव व  तपशील सादर केला नाही.  त्यामुळे  प्रवर्गातील औषधी अवैधरित्या खरेदी करून, अवैध, जादा दराने विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याबद्दल औषध व्यावसायिक मोहम्मद जावेद यांच्या विरुद्ध  कदिम जालना पो.स्टेशन येथे  श्रीमती अंजली  मिटकर  औषध निरीक्षक, जालना यांचे फिर्यादीवरून  

 दि. 09 जुलै 2021 रोजी कदिम जालना पोलीस स्टेशन येथे भादंवि चे कलम 420, 336 ई. अंतर्गत FIR  दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई  सह-आयुक्त (औषधे) औरंगाबाद विभागाचे संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  व औषध निरिक्षक, जालना श्रीमती अंजली  मिटकर यांनी कारवाई  केली. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!