मराठावाडा

सोयाबीनवरील चक्री भुंगी किडीचे व्यवस्थापन

   जालना, दि.15 ( न्यूज) :- राज्यात सायोबीन पिकाची मोठ्या प्रमाणावार लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. यावर्षी सुध्दा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खचा रकफन त्यामध्ये अंडी घालते यामुळे झाडाचया वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळुन जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे पुर्ण झाड वाळुन जाते व वेळेवर उपाया योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभुमीवर सोयाबीनवारील चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास शेतकरी बंधुंनी खालील उपाय योजना करण्याबाबत कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

images (60)
images (60)

         पेरणी जुलैच्या दुस-या आठवड्याच्या आत पुर्ण करावी. पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाणे शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढतो. जेथे चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमिपणे आढळतो. अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. या पध्दतीचा 15 दिवसातुन जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणा-या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालु नये याकरीता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.पीक पेरणीच्या 30-35 दिवसानंतर प्रादुर्भाव दिसताच 7-10 दिवसात ट्रायझोफॉस 40 ई.सी. 16 मिली प्रति 10 लिटर पाणी अथवा थायक्लोर्प्रीड 21.7 एस.सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के + लॅब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेङ सी. 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!