जालना जिल्हा

ऑनलाइन अत्यावश्यक पास वेळेत मिळेना – रुग्णांची गैरसोय

जिल्हा पोलीस अधीक्षकानी लक्ष देण्याची मागणी

अकोलादेव न्यूज जाफराबाद

दरम्यान जिल्हा स्तरावरून केली जाणारी ही ऑनलाईन पासची कारवाई विनाविलंब करावी नसता ऑनलाईन पासचे अधिकार पुर्वीप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशन ला द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

अधिकारी यांच्या मते

यबाबत जिल्हा पोलिस मुख्यालयातील वायरलेस विभागातील पोलीस निरीक्षक व्यास याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कुठल्याही ऑनलाइन पासेस साठी योग्य ती माहिती भरली असल्यास सदर्भित पास ला त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे याबाबत असंख्य पासेस ह्या चुकीच्या पद्धतीने भरण्यात आल्याने हा प्रकार होत असावा
तर दवाखान्यात किंवा मेडिकल इमर्जन्सी साठी करण्यात येणाऱ्या पासेस मध्ये ज्या खाजगी वाहनातून प्रवास करण्यात येणार आहे त्या वाहनाचे आर सी बुक,ड्रायव्हर चे ड्राईव्हिंग लायसन्स, गाडीच्या इन्शुरन्स चे कागदपत्रे व दवाखान्याचे अपॉईंटमेंट लेटर हे एका पीडिएफ फाइल मध्ये टाकून उपलोड करावे तरच त्या पासला मजुरी दिली जाते. तर जिल्हाबाहेर जाणाऱ्या रुग्णांना मात्र उपचार घेऊन आल्यानंतर १५ दिवस घरातच राहावे लागेल.

ऑनलाईन पासची कारवाई केल्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांनी जर वरिष्ठ कार्यालयाला फोन केला तर रूग्णालयाची कागदपत्रे सोबत ठेवा तुम्हाला पासची आवश्यकता नाही असे उत्तर दिले जात असल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र रुग्णाला गाडीत टाकून गाडी पेट्रोल पंपावर नेली तर तेथे पास शिवाय डिझेल टाकण्यास स्पष्ट नकार दिला जात आहे.लॉकडाऊनच्या काळात दिली जाणारी ही पास ऑनलाईन मिळत असल्याने सामान्य नागरिकांना ऑनलाईन करण्यासठी अन्य दुसरयांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातही यापूर्वी ही हस्तलिखित पास पोलीस स्टेशन स्तरावर दिली जात असल्याने काही अडचण आल्यास नागरिक सहज पोलीस स्टेशन पर्यंत जायचे. मात्र मागील आठवडाभरापासून हया पासचे अधिकार जिल्हा कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाइन पास ची माहिती भरल्यानंतर एक टोकन नंबर तेवढा येतो. व पुढील परवानगी ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातुन केली जाते .परंतु अनेकांच्या पासेस ह्या ऑनलाइन करूनही त्यावर फक्त आम्ही आपली माहिती तपासीत असल्याचा मसेज येत आहे यामुळे ज्या कामासाठी हा पास काढला आहे ते काम होत नाही. अशावेळी नेमके कोणाशी संपर्क साधावा हेही कळत नसल्याने मात्र मोठी अडचण होत आहे तर पासेस बाबत आता पोलीस ठाण्यात याबाबत आता जिल्हा अधीक्षक कार्यालयाला संपर्क करण्याचे सांगितले जात आहे. शिवाय कोठून तरी मोबाईल क्रमांक घेवून वरीष्ठ कार्यालयात संपर्क केला तरी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप ही नागरिकांतुन होत आहे. यामुळे टेंभुर्णी व परिसरातील अनेक रूग्णांना जालना येथे उपचारासाठी नेताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

समदखा पठाण टेंभुर्णी

माझे वडील अहेमदखा पठाण हे दुर्धर आजाराने त्रस्त आहे. बुधवारी रात्री मी ऑनलाईन पाससाठी एका संगणक केंद्रावरून पासला अर्ज केला . तेंव्हा केवळ टोकण क्रमांक आला पण परवानगी मिळाली नाही. गुरुवारी वडिलांना त्रास अधिक वाढल्याने मी एका खाजगी वाहनाने वडिलांना घेवून जालन्याला निघालो. टेंभुर्णी येथे पेट्रोल पंपावर गेल्यावर तेथे डिझेलसाठी परवानगीच्या नावाखाली अडवणूक करण्यात आली. शेवटी असह्य वेदना होत असलेल्या स्थितीत वडिलांना मला परत घरी न्यावे लागले. तर पास शिवाय पेट्रोल दिले जात नसल्याने अत्यावश्यक असलेल्या पासेला मंजुरी वेळेत दिली जावे यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही

सदर्भित अत्यावश्यक पासेस ह्या तालुका स्तरावरून देण्यात यावे ही मागणी ग्रामस्थांतुन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक