मंठा तालुका

मंठा तालुक्यातील पूर्णाकाठी ११ हजार ब्रास वाळुसाठे वैध

तपासणी पथक कागदावर : महसूलच्या परवानगीने ५ वाळुसाठे

images (60)
images (60)

प्रतिनिधी । तळणी

तळणी : मंठा तालुक्यातील पूर्णा नदी काढच्या १० गावात महसूलच्या परवानगीच्या नावाखाली अनेकांनी हजारो ब्रास वाळुसाठे केले आहेत . या वाळुसाठ्यातून वाळुची उचल करताना महसूलचे नियंत्रण नसून यातील नेमके किती वाळुसाठे वैध अन् अवैध हेच सर्वसामान्यांना कळायला मार्ग नाही.

जिल्हा प्रशासनाने यावर्षी दोन टप्प्यांत तब्बल ८ वाळु घाटाचे लिलाव केले. त्यातच काही वाळुघाट उशिराने सुरु झाले अन् वेळेपूर्वीच उत्खनन बंद केल्याने लिलावधारक वाळु ठेकेदाराचे मनसुबे सफल झाले नाहीत.
जालना जिल्ह्य़ात सर्वाधिक लिलाव मंठा तालुक्यातील वाळुघाटाचे झाल्याने लिलावातून तब्बल १८ कोटींचा महसूल प्राप्त झाला. यातील काही लिलावधारकाना महसूलच्या अधिकारी – कर्मचा-यानी मोकळी तर काहींना त्रासदायक भूमिकेतून संबंधित ठेकेदाराना जावे लागले. नदीपात्रातून वाळु उचलून काही अंतरावर वाळुचे साठे करताना अनेक अडचणींसह अतिरिक्त खर्चाला ठेकेदारांना समोरे जावे लागले. १ जूलैपासून सासखेडा व त्यानंतर तळणी येथील दोन वाळुसाठ्यावरुन वाळुची उचल सुरु झाली. मात्र, वाळुची उचल करताना महसूलकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. महसूलचे पथकही कागदावर दिसून येत आहे. त्यामुळे वाळूमाफियाचे फावत आहे. वाळुसाठ्याच्या नावाखाली थेट नदीपात्रातून अवैध वाळुचोरी वाढली आहे. वाळुसाठे उचलण्यासाठी प्रशासनाकडून ३१ सप्टेंबर सेवट ही तारीख देण्यात आली आहे.

इटीएस मोजणी पुर्ण – मोरे

पुर्णा काठच्या ‘त्या’ ५ ठिकाणच्या वाळुसाठ्याची दोनदा इटीएस मोजणी करण्यात आली आहे. अवैध वाळुसाठे जप्तीची कारवाई व अवैध वाळु वाहतूकीविरुध्द कारवाई सुरु असल्याचे मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

पथकाची नेमणूक – जाधव

वाळुसाठ्यातून वाळुउचल व वाळु वाहतुक यावर नियंत्रण व तपासणीसाठी पथकाची नेमणूक करण्यात आल्याचे परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.

महसूलच्या परवानगीनंतर वाळुसाठे …

ठेकेदार सुनिल कांगणे यांना ३ हजार ५०० ब्रास ( सासखेडा ) , विजय मापारी यांना २ हजार ५०० ब्रास ( तळणी ) , प्रल्हाद दराडे यांना १ हजार ९०० ब्रास ( भूवन ) , माधव देशमूख यांना १ हजार ९०० ब्रास ( तळणी ) व भूषण मापारी यांना १ हजार ६०० ब्रास ( लिबंखेडा ) येथे महसूलच्या परवानगीनंतर ११ हजार ४०० ब्रास वाळुसाठे केल्याचे महसूलचे म्हणणे आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!