महाराष्ट्र न्यूज

रामदास पाटील साळवे यांनी स्वखर्चातून बुजवले रस्त्यावरील खड्डे

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

औरंगाबाद जळगाव हायवे वरील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत,आणि या खड्यांमुळे अपघातचे प्रमाण वाढले असुन दि.१९ जुलै रोजी सामाजिक कार्येकर्ते रामदास पाटील साळवे यांनी स्वखर्चाने हे खड्डे बुजवले आहेत.

औरंगाबाद जळगाव या महामार्गाचे काम चालु असुन सिल्लोड तालुक्यातील भवन येथिल रोडचे काम संथ गतीने चालु असुन हा रस्ता पुर्ण उखडला असुन ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाने नेहमी दुर्लक्षच करत असल्याने अशात भवन येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील साळवे यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून संपूर्ण खड्डे बुजवले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!