जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

जालना:गणेशोत्सवासाठी हे असे असतील शासकीय नियम

जालना दि. 3- कोविड19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असुन  शासनाने याबाबत मार्गदर्शन सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना डॉ. विजय राठोड यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897 नुसार प्राप्‍त अधिकारान्‍वये व शासनाच्या परिपत्रकानुसार जालना जिल्‍ह्यामध्‍ये गणेशोत्‍सव साजरा करण्‍याबाबत दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

images (60)
images (60)

१)       सार्वजनिक गणेशोत्‍सवासाठी गणेशोत्‍सव मंडळांनी नगर परिषद/नगर पंचायत/स्‍थानिक प्रशासन यांची त्‍यांचे धोरणानूसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्‍यक राहील.

२)       कोविड-19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता स्‍थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादीत स्‍वरूपाचे मंडप उभारण्‍यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्‍याने घरगुती तसेच सार्वजनीक गणपतीची सजावट करतांना त्‍यात भपकेबाजी नसावी.

३)       श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनीक मंडळांकरीता 4 फुट व घरगुती  गणपतीकरीता 2 फुटांच्‍या मर्यादेत असावी.

४)       यावर्षी शक्‍यतो पारंपारीक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्‍यास त्‍याचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्‍यास नजिकच्‍या कृत्रीम विसर्जनस्‍थळी विसर्जन करण्‍यात यावे.

५)       उत्‍सवाकरीता वर्गणी / देणगी स्‍वेच्‍छेने दिल्‍यास त्‍याचा स्‍वीकार करावा.जाहिरातींच्‍या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्‍य विषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिराती प्रदर्शित करण्‍यास पसंती देण्‍यात यावी.

६)       सांस्‍कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्‍य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्‍तदान) आयोजीत करण्‍यास प्राधान्‍य देण्‍यात यावे आणि  त्‍याद्वारे करोना, मलेरीया, डेंग्‍यू, इ.आजार आणि  त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करण्‍यात यावी.

७)       लागु करण्‍यात आलेले Level Of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्‍यामध्‍ये गणेशोत्‍सवानिमित्‍त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. 

८)       आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मीक कार्यक्रम आयोजीत करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच ध्‍वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

९)       श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्‍यादीद्वारे उपलब्‍ध करून देण्‍याबाबत जास्‍तीत जास्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

१०)   गणपती मंडपामध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. प्रत्‍यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजकल डिस्‍टंसींग) तसेच स्‍वच्‍छतेचे नियम (मास्‍क, सॅनिटायझर इत्‍यादी) पाळण्‍याकडे विशेष लक्ष  देण्‍यात यावे.

११)   श्रींच्‍या आगमन व विर्सजन मिरवणूका काढण्‍यात येवू नयेत. विसर्जनाच्‍या पारंपारिक पध्‍दतीत विसर्जन स्‍?थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्‍थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्‍ठ नागरीकांनी सुरक्षेच्‍या दृष्‍टीने विसर्जनस्‍थळी जाणे टाळावे. संपुर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्‍या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्‍या काढण्‍यात येऊ नयेत. 

१२)   नगर पालीका/नगर पंचायत, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्‍था, लोकप्रतिनिधी, स्‍वयंसेवी संस्‍था, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, इत्‍यादींच्‍या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्‍यात यावी.

१३)   कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत नगर पालीका / नगर पंचायत, पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्‍यक्ष सण सुरु होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजुन काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखिल अनुपालन करावे.

सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधीत यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यास टाळाटाळ केल्‍यास अथवा विरोध दर्शविल्‍यास संबंधीतांच्‍या विरूध्‍द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व  भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1866) कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाई पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.   

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!