कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात लॉकडाऊनबाबतचे जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश

ब्रेक द चेन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित मार्गदर्शन सुचना निर्गमित

images (60)
images (60)

जालना दि.3
राज्‍य शासनाने करोना विषाणू (कोविड-19) रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण संदर्भातील ब्रेक द चेन आदेशात सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्‍या असुन त्याअनुषंगाने जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना डॉ.विजय राठोड यांनी  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897, महाराष्‍ट्र कोविड-19, उपाययोजना नियम 2020 अन्‍वये प्राप्‍त अधिकारान्‍वये जालना जिल्‍हयात शासनाने दिलेल्‍या निर्देशांच्‍या अधीन राहून  3 ऑगस्ट, 2021रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.  

संपूर्ण जालना जिल्‍ह्याकरीता यापूर्वी लागू केलेल्‍या निर्बंधात खाली नमूद केलेल्या मर्यादेत विद्यमान निर्बंधामध्‍ये सुधारणा करण्‍यात येत आहे.  

1)      सर्व अत्‍यावश्‍यक व बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने (शॉपींग मॉल्‍ससह) सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी 3:00 वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्‍यावश्‍यक दुकाने वगळता सर्व दुकाने आणि मॉल हे रविवारी बंद राहतील.

2)     सर्व सार्वजनिक उद्याने आणि क्रीडांगणे हे व्यायाम, चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग या हेतूंसाठी खुली राहतील.

3)      सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. कामाच्‍या ठिकाणी येण्‍या-जाण्‍यासाठी प्रवास करताना गर्दी टाळण्याच्‍या हेतूने कामाच्‍या वेळांमध्‍ये सुनिश्चितता करावी.

4)    जे कार्यालये वर्क फ्रॉम होम पध्‍दतीने काम करू शकतात त्यांनी तसे करणे सुरू ठेवावे.

5)     सर्व कृषीविषयक कामे व सेवा, स्‍थापत्‍य कामे, औद्योगिक उपक्रम, मालाची वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील.

6)     व्यायामशाळा, योगकेंद्रे, केशकर्तनालय/सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे एअर कंडिशनरचा वापर न करता आणि 50 टक्के क्षमतेसह आठवड्याच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) रात्री 8:00 पर्यंत आणि शनिवारी दुपारी 3:00  वाजेपर्यंत सुरु राहतील. या सेवा रविवारी बंद राहतील.

7)     सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टीप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

8)     जिल्‍हयातील सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

9)      राज्य शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू राहतील.

10)  सर्व रेस्टॉरंट्स टक्के आसन क्षमतेसह आठवड्याच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) सर्व कोविड-19 प्रोटोकॉल पालन करण्याच्या अधीन राहून संध्याकाळी 4:00 पर्यंत सुरु राहतील, पार्सल सुविधा/ Take Away संदर्भात सद्या असलेले नियम कायम राहतील.

11)   रात्री 9:00 ते सकाळी 5:00 अत्‍यावश्‍यक कारणांशिवाय बाहेर पडण्‍यास प्रतिबंध राहील.

12)  गर्दी टाळण्यासाठी, वाढदिवस साजरा करण्यावर, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, रॅली, निषेध मोर्चे संदर्भात सद्यस्थितीतील निर्बंध कायम राहतील.

13)  सर्व कोविड-19 प्रोटोकॉल-मास्कचा वापर, शारिरीक अंतर पाळणे इत्यादींचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. याचे उल्‍लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या संबंधित कलमांखाली दोषींवर कारवाई करावी.

या आदेशात विशेषतः नमूद नसलेले इतर सर्व मुद्दे पूर्वीच्या आदेशानुसार लागू राहतील.

आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड स‍ंहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करतांना सद्भावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्‍द कार्यवाही केली जाणार नसल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!