अंबड तालुका

अंबड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची सात ऑगस्ट रोजी आढावा बैठक आयोजित

मंडळ दिनी राष्ट्रीय समाज पक्षाची भव्य रॅली व आढावा बैठक.

प्रतिनिधी अंबड

images (60)
images (60)

शनिवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जय मल्हार ट्रेडर्स अंबड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे ,शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष रासप महासचिव बाळासाहेब दोडतले ,रा स प प्रदेश प्रवक्ते भास्कर टेकाळे सर ,मराठवाडा संपर्क प्रमुख तथा नगरसेवक अशोक लांडे, जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर, जिल्हाध्यक्ष इंजि. बाबासाहेब भोजने युवक जिल्हाध्यक्ष गोविंद जाधव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे तसेच आढावा बैठकीनंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे चौक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ,महात्मा ज्योतिराव फुले चौक ,महावीर चौक मार्गे पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर या महामानवांना अभिवादन करून रॅली दोदडगाव कडे रवाना होईल दोदडगाव येथे मंडल स्तंभ अभिवादन सभा होणार आहे तरी जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान अंबड शहराध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!